तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली हरनाझ संधू ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हरनाझचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत हरनाझचे वजन हे पहिल्यापेक्षा जास्त दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान नुकतंच हरनाझने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हरनाझ संधूने नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमधील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिने रॅम्पवॉकही केला. या कार्यक्रमाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत हरनाझचे वजन वाढल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरही अतिरिक्त फॅट जमा झाल्याचेही पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमुळे तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. मात्र नुकतंच तिने या सर्वांवर मौन सोडत भाष्य केले आहे.
वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…
एका मुलाखतीत तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हरनाझने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. “मला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. मी माझ्या शरीराचा आदर करते. मला माझ्यावर लावण्यात येणारे आरोप पुसताही येतात. मी बॉडी शेमिंग करणाऱ्यांचा तिरस्कार करते”, असे हरनाझ म्हणाली.
“मला Celiac नावाचा आजार आहे. अनेक लोकांना माहिती नाही पण मला ग्लूटेनची अॅलर्जी आहे. ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान पोहचतं. हा आतड्यासंबंधीचा एक आजार आहे.” असेही तिने सांगितले.
“आपला देश आपली संस्कृती सोडून…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“ज्या लोकांना ग्लूटेनची अॅलर्जी असते आणि त्यासोबतच ज्यांना Celiac आजार असतो, त्यांच्या शरीरात अन्न, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण होण्याचा त्रास होतो. या आजाराचा सामना करताना अनेकांच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. ग्लूटेनची अॅलर्जी असलेल्या लोकांना त्यांच्या वजनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण जाते”, असेही तिने सांगितले.
कोण आहे हरनाझ संधू?
चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.