अभिनेत्री मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात वितुष्ट आल्यानंतर आता दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने मलायकाबद्दलच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या ७ पर्वाच्या निमित्ताने करण आणि मलायक एकत्र परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. इंडियाज गॉट टॅलेंट शोच्या उद्घाटन सोहळ्यात हसत खेळत झालेल्या गप्पांच्या दरम्यान करणने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मलायकाला पाहून कोणाच्याही मनात लालसा निर्माण होईल, हे तर तुम्हाला माहितच आहे. माझ्याही मनात तिच्याबद्दल लालसा आहे’ असं करण म्हणाला.
यावेळी करणने मलायकाच्या मुन्नी बदनाम गाण्यावरुन ‘इथे मी मुन्ना आहे आणि मी बदनाम व्हायला तयार आहे’ अशी कोपरखळीही करणने मारली.यावर मलायकाने आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल ‘तशा’ भावना वाटतात, आणि हा सर्वांना माहित असलेला खुलासा आहे, असे प्रत्युत्तर दिले.