अभिनेता के के मेनन त्याची ओळख एक गंभीर अभिनेता म्हणून होण्याबाबत चिंतित आहे. चित्रपट समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘सरकार’, ‘कॉर्पोरेट’ अणि ‘गुलाल’ सारख्या चित्रपटात काम केलेल्या ४५ वर्षीय मेननने चित्रपटात नेहमी प्रभवशाली व्यक्तिरेखा करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे.
तो म्हणाला, लोक नेहमी माझ्यावर गंभीर असल्याचा आरोप करतात. ‘हनिमून ट्रॅव्हल्स’ आणि ‘संकट सिटी’ या चित्रपटांमधील माझे काम गंभीर स्वरूपाचे होते का ? हे चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांकडे पुरेसे पैसे नव्हते. वैयक्तिकरित्या व्यक्ती विनोदी अथवा गंभीर स्वरूपाची असू शकते, परंतु, अभिनय करताना मी त्या व्यक्तिरेखेनुसार माझे परिपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करतो.
मेनन ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ या चित्रपटात एका वरिष्ठ शल्यविशारदाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असून, यात देशातील वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या निष्काळजीपणाबाबत आवाज उठविण्यात आला आहे.
आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाची अनेक प्रकरणे आहेत. अशा अनेक सत्याघटनांचा समावेश चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटातील माझी भूमिका एका वरिष्ठ शल्यविशादाची आहे, ज्याने अनेकांचे प्राण वाचविले असून, एका आपतकालीन प्रसंगी त्याच्या हातून चूक घडल्याचे चित्रपटात दर्शविण्यात आल्याचे मेननने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा