काही वर्षांपूर्वी करिना कपूर खान हिनं अभिनेता सैफ अली खानसोबत विवाहगाठ बांधली. या दोघांना एक मुलगादेखील आहे. सैफनं पत्नी अमृता सिंगसोबत घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी करिनासोबत लग्न केलं. अर्थात या लग्नामुळे अमृता आणि करिनाच्या नात्यात दुरावा आला असं अनेकांना वाटतं. मात्र कॉफी विथ करण कार्यक्रमात करिनानं तिच्या आणि अमृताच्या नात्याचे अनेक पदर उलगडले.
सैफ- अमृताची मुलगी सारा अली खानसोबत करिनाची घट्ट मैत्री आहे. मात्र इतक्या वर्षांत मी कधीही अमृता सिंगला समोरासमोर भेटले नाही हे करिनानं कॉफी विथ करण कार्यक्रमात मान्य केलं. ‘मला अमृताबद्दल खूपच आदर आहे मात्र तिला प्रत्यक्षात भेटण्याची वेळ मात्र आली नाही’ असं करिना म्हणाली.
सैफ अली खाननं ‘टशन’च्या सेटवर लग्नाची मागणी घातली असंही करिना म्हणाली. ग्रीसमध्ये सैफनं लग्नाची मागणी मला घातली होती. त्यावेळी मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा आयुष्यातील सर्वात अविभाज्य भाग असल्याचं सैफनं मान्य केलं होतं. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही हे त्यानं माझ्याजवळ कबुल केलं होतं असंही करिना म्हणाली. करिनानं अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत कॉफी विथ करण कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.