अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण दोघांनी जाहीरपणे कधीच कबुली नव्हती. आता मलायकाने एका चॅट शोमध्ये अर्जुन तिला आवडत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिने किरण खेर, वीर दास आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांच्यासोबत हजेरी लावली होती. या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून मलायकाच्या कबुलीमुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे.

‘कॉफी विथ करण’च्या या प्रोमोमध्ये करण जोहरने सर्वोत्तम अभिनेता कोण वाटतो असा प्रश्न विचारला. त्यावर किरण खेर यांनी अर्जुनचं नाव घेतलं. त्यांच्या उत्तराचं समर्थन करत मलायका पुढे म्हणाली, ‘मलाही अर्जुन आवडतो, मग तो कसाही असू दे.’ तिच्या या उत्तरानंतर करण जोहर आणि इतर उपस्थित कलाकार सूचक हसू लागले. मलायकाच्या या कबुलीनंतर अर्जुनसोबतचा तिचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. हे दोघंही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/BuUS6vCI8qU/

वाचा : शिल्पा शिंदेला बलात्काराच्या धमक्या

याआधी अर्जुननेही करण जोहरच्या या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने त्याला रिलेशनशिप स्टेटस विचारले असता, मी सिंगल नाही असं उत्तर अर्जुनने दिलं होतं. अर्जुन- मलायकाने मिळून घर विकत घेतल्याचीही चर्चा होती. इतकंच नव्हे तर या वर्षाअखेरपर्यंत हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

Story img Loader