वीस वर्षांपूर्वी ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याने अल्ताफ राजाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानी रचलेल्या किंवा गायलेल्या गाण्यांमध्ये दिसणा-या अल्ताफने १९९८ च्या ‘यमराज’ चित्रपटात काम देखील केले होते. ‘घनचक्कर’ चित्रपटातील ‘झोलू राम’ गाण्याद्वारे अल्ताफ राजाने पुनरागमन केले आहे. तीन वर्षाच्या काळानंतर तो केवळ बॉलिवूडच्या संगीत क्षेत्रात पदार्पण करत नसून, १५ वर्षांच्या खंडानंतर त्याने म्युझिक अल्बमसुद्धा आणला आहे. त्याच्या विजनवासाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, मी इथेच होतो. मी गाण्यांचे शो करत होतो आणि गाणी लिहित होतो. पण, चर्चेत नव्हतो.
अमित त्रिवेदीनी रचलेले हे गाणे इमरान हाश्मी आणि राजावर चित्रीत करण्यात आले आहे. आठवड्याभरातच या गाण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर १.४ लाख जणांनी पाहिला. राजा म्हणाला, माझ्यासाठी हे पुनरागमनासारखे आहे. हे गाणे मला गायला मिळाले याचा मला आनंद आहे. अमिताभ भट्टाचार्यने लिहिलेल्या या गाण्यातील शब्द खूप सुंदर आहेत. शिवाय या गाण्याच्या व्हिडिओमध्ये देखील मी आहे, मझ्यासाठी खरोखरच ही एक चांगली बाब आहे.
तो पुढे म्हणाला, माझ्यावर देवाची कृपा असून, चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. जेव्हा जेव्हा मी नवीन गाणे घेऊन आलो, लोकांनी त्याचे स्वागतच केले. नाविन्यपूर्ण असे ‘झोलू राम’ हे गाणे माझ्या हृदयाजवळ आहे
अल्ताफ राजा त्याच्या भविष्यातील योजनांबाबत काहीही बोलत नाही. अल्ताफ म्हणाला, नवीन गाण्यावर काम करत असून, याबाबत काही सांगू शकणार नाही. मला लोकांना आश्चर्यचकीत करायला आवडते. ‘झोलू राम’ गाण्याने सर्वांना आश्चर्यचकीत केले असून, जेव्हा मी एखादा अल्बम अथवा गाणे घेऊन येईन तेव्हा लोकांना ते कळेलच आणि त्यांना आश्चर्याचा सु:खद धक्का बसेल.

Story img Loader