आमीर खान या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी गमाविल्याबद्दल अभिनेता अर्शद वारसी याला रुखरुख वाटते आहे. त्याने आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्या आहेत.
राजकुमार हिरानी यांच्या आगामी पीके चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. याच चित्रपटात त्याच्याबरोबर अर्शद वारसी याने काम करावे, यासाठी हिरानी आग्रही होते. मात्र, तारखा उपलब्ध नसल्यामुळे अर्शदला या चित्रपटासाठी नाही म्हणावे लागले होते. अर्शद म्हणतो, “मी एक चांगली संधी गमावली, हे मला माहिती आहे. आमीरबरोबर काम करण्याची संधी मोठीच होती. भविष्यात त्याच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. तो उत्कृष्ट अभिनेता आहेच. पण त्याचबरोबर भला माणूसही आहे.”
विशाल भारद्वाज यांच्या इश्कियाच्या सिक्वेलसाठी तारखा दिल्यामुळे अर्शदला हिरानी यांच्या पीकेला नकार द्यावा लागला.

Story img Loader