बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर रणवीरला जणू आकाशच ठेंगणं वाटू लागलं आहे. म्हणूनच त्यानं सर्वांसमोर माझं जगातील सुंदर मुलीशी लग्न झाल्याचं कबुल करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीर आणि दीपिकाची दुसरी रिसेप्शन पार्टी गेल्याच आठवड्यात पार पडली. या पार्टीत दीप-वीरचा अतरंगी अंदाज पाहायला मिळाला. रणवीरच्या बहिणीनं नवविवाहित जोडप्यासाठी ही पार्टी ठेवली होती. यावेळी सर्वांसमोर रणवीरनं दीपिकावरचं प्रेम व्यक्त करत आपलं मनोगत सांगितलं. माझं जगातील सर्वात सुंदर मुलीशी लग्न झालंय, याचा मला आनंद आहे आम्ही एकमेकांपेक्षा खूपच भिन्न आहोत पण तरीही मी तिच्यासोबत खूप खूप खूश आहे असं म्हणत त्यानं आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी त्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या दीपिकाची तुलना त्यानं मॅक्सिकन आर्टिस्ट फ्रिडा काहलो हिच्याशी केली. सब्यासाचीनं डिझाइन केलेला लेहंगा परिधान करून स्टेजवर आलेली दीपिका मला फ्रिडासारखीच भासते असंही रणवीर म्हणाला. यावेळी जमलेल्या सर्वांनीच दोघांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या.

१४ आणि १५ नोव्हेंबरला पारंपरिक कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांनी २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईत आपल्या मित्रपरिवारासाठी आणि बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I married world most beautiful girl ranveer singh at his wedding party
Show comments