सध्या चित्रपटांमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामधील वयाच्या गणिताचा फारसा विचार केला जात नाही. जर चित्रपटातील अभिनेता ५० वर्षाचा असेल तर अभिनेत्री त्याच्या अर्ध्या वयाच्या असल्याचे पाहावयास मिळते. यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान, आमिर अशा मोठ्या कलाकारांचीही नावे आहेत. पण, याला अपवाद असलेले अभिनेता म्हणजे नसिरुद्दीन शाह हे आहेत.
ओशियननामा महोत्सवात नसिरुद्दीन हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी कधीचं कमर्शियल हिरो बनण्याचा किंवा माझ्य़ा मुलीपेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रींशी रोमान्स करण्याचा मी कधीच स्वप्नातसुद्धा विचार केला नाही. यावेळी त्यांनी आपल्या उमेदीच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला.ते म्हणाले, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी कधी अपयशाची भीती नाही बाळगली. तुम्ही याला माझा विश्वास म्हणू शकता किंवा माझा वेडेपणा. मला जे हवे आहे तेच मी करतोय याची मला पूर्ण शाश्वती होती. त्यामुळे जर मी यशस्वी नाही झालो तर.. असा काही विचार करण्यात अर्थच नव्हता.

Story img Loader