उत्तर प्रदेशच्या सैफीया गावामध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सास्कृतीक कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे टिकेस पात्र ठरलेली बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या राजकीय जाणिवांची खंत वाटू लागली आहे. तिला सध्या राजकारणामध्ये काय सुरू आहे याची माहिती नसल्याचे वाईट वाटत असल्याची जाहिर कबूली आलियाने दिली आहे.          
“माला जुन्या वादात अडकायचे नाही. मात्र, मला उत्तर प्रदेशमध्ये काय सुरू आहे याची माहिती नव्हती. मला दंगलींबद्दल माहिती होती. परूंतू कार्यक्रमादरम्यान दंगल पिडितांच्या स्थितीविषयी काहिच माहिती नसल्याचे वाईट वाटते. मी आजूबाजूला काय घडते ते जाणून घेणे आवश्यक आहे,” असे आलिया म्हणाली.  
असे असले तरी ज्या कलाकारांनी त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांना माणुसकीच नाही असे म्हणणे देखील योग्य नसल्याचे व या बाबीला चर्चेचा मुद्दा बनवण्यात आला हे देखील चुकीचे असल्याचे आलियाचे मत आहे.  
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग याच्या जन्म गावी उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान, माधुरी दिक्षीत आणि आलिया भट्ट यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, आलिया भट्टचे वडिल चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी मुलीला या कार्यक्रमास जाण्यापासून थांबवू न शकल्याने दिलगिरी व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा