पाच वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहणा-या मेरी कोमची आगामी चित्रपटात भूमिका करणा-या प्रियांका चोप्राच्या जीवनचा काही भाग या महान खेळाडूसारखाच होता, असे तिचे म्हणणे आहे.
प्रियांका म्हणाली की, मेरीच्या जीवनाची कथा माझ्या जीवनाच्या कथेसारखीच आहे. मी जेव्हा चित्रपटसृष्टीत आले होते तेव्हा मी सुद्धा संघर्ष केला आणि मी एकटी बसून रडलेदेखील होते. खरं पाहायला गेले तर स्वप्न पाहणा-या प्रत्येक मुलीची हीच कथा आहे. मेरी कोम चित्रपटात मणिपूरमधील भूमिहीन शेतक-याच्या घरात जन्माला आलेल्या मेरीच्या परीक्षांची आणि दुःखाची कथा सांगितली आहे. जिने एका मुष्ठियोद्धाच्या (बॉक्सर) रुपात नावलौकिक कमविले आहे.
भारतात महिला खेळाडूंच्या जीवनावर अद्याप चित्रपट बनविण्यात आलेले नाहीत. मला ख-या मेरी कोमची कथा ऐकवायची आहे. मेरी ही मुष्ठियोद्धा असण्याबरोबरच एक सामान्य मुलगीसुद्धा आहे. जी तिच्या बॉक्सिंग ग्लोव्हजमध्ये दडलेल्या नखांना नेल पॉलिश लावते, असे प्रियांका म्हणाली. तसेच, इतर मुलींप्रमाणेच मेरीला गाणे गाणे, चित्रपट पाहणे आणि इतर गोष्टी आवडतात, असेही ती म्हणाली. यावेळी मेरी कोमसुद्धा तिथे उपस्थित होती.
मेरी म्हणाली की, दिल्ली तसेच देशातील अन्य भागात पूर्वेकडील मुलींशी नेपाळी किंवा गैर-भारतीयांसारखा व्यवहार केला जातो. मणिपूरमधली स्थिती भयानक होत चालली आहे. मला सुरक्षारक्षकांविना बाहेर जाण्यास भीती वाटते. विभागातील पोलिसांनी मला सुरक्षा दिलेली आहे. नाहीतर केवळ मीच नाही तर माझे कुटुंबही सुरक्षित राहिले नसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा