खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. दरम्यान, नुसरत जहाँपासून विभक्त झाल्यानंतर निखिल जैन यांनी पहिल्यांदा त्यांच्या आणि नुसरत यांच्या रिलेशनशिपवर चर्चा केली आहे.
निखिल यांनी ‘इ समय डिजिटल’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते म्हणाले, ‘ते अजूनही त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी नुसरत जहाँ यांच्या प्रेमात आहेत.’ निखिल जैनपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. एवढचं काय तर निखिल हे बायसेक्शुअल असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. मात्र, या मुलाखतीत निखिल यांनी ते ‘बायसेक्शुअल नाही असं म्हटलं आहे.’
सरत यांनी १९ जून २०१९ मध्ये तुर्कीत निखील जैनशी लग्न केले होते. ते दोघे नोव्हेंबर २०२० मध्ये विभक्त झाले. त्यावेळी नुसरत यांनी त्यांच्या लग्न स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी नुसरत म्हणाल्या त्यांचे लग्न तुर्कीस्तानमध्ये झाले असून विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांची नोंदणी भारतात झालेली नाही. त्यामुळे हा विवाह भारतात कायदेशीररित्या वैध नाही.
आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण
आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का
त्यानंतर नुसरत या बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात नुसरत यांनी मुलाला जन्म दिला. नुसरत यांच्या मुलाचे वडील यश दासगुप्ता आहे. तर त्यांच्या मुलाचे नाव ईशान जे दासगुप्ता आहे.