सहा वर्षांच्या दीर्घ काळानंतर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या ऍक्शन-कॉमेडी चित्रपटात काम करत असलेली दीपिका पदुकोण म्हणते, शाहरुखवर माझा व्यक्तिगत आणि व्यावहारिक पातळीवर पूर्ण विश्वास आहे. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास केलेल्या दीपिकाने २००७ मध्ये ‘ओम शांति ओम’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात शहारूख खानची प्रमुख भूमिका होती. चित्रपटात दीपिकाचा डबल रोल होता.
दीपिका म्हणाली, शाहरुखबरोबर दुस-यांदा काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. तो माझा चांगला मित्र असून, मी त्याच्यावर व्यक्तिगत आणि व्यावहारिक पातळीवर विश्वास ठेवू शकते.  जेव्हा मला गरज असेल, तेव्हा तो नक्कीच मला मदत करेल, याची मला खात्री आहे.
‘रेड चिलीज एन्टरटेनमेंट’च्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाची निर्माती शाहरूख खानची पत्नी गौरी असून, रोहित शेट्टी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.  ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा