दबंग सलमान त्याच्या चित्रपटांनी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या प्रेमप्रेकरणांमुळेही सगळ्यांचे लक्ष्य वेधतो. सलमानची छोटीतली छोटी गोष्टदेखील चर्चेचा विषय बनते. सलमानचं लग्न हा बॉलीवूडमधला सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. त्यातून आता अविवाहीत सलमानला बाळस्वरुपात मुलगी असावी असे एका पत्रकार परिषदेत त्यांने सांगितले आहे. ‘ह्युमन बिइंग फाउंडेशन’ची निर्मिती करणारा सलमान एका कार्यक्रमाला गेला होता. हा कार्यक्रम होता, मुली आणि महिला सशक्तीकरणाचा. यावेळी सलमानने त्याच्या मनातल्या लहान मुलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
सलमान म्हणाला की, माझं लग्न झालं आणि मला भविष्यात कधी मुल होईल ते मुलगीच असावी. अशी माझी मनापासून इच्छा आहे. सलमानच हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I want a girl child salman