बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान बॉलीवूडमधल्या सर्वात महागड्या फिल्मस्टारपैकी एक असला तरी त्याची एक इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही. स्वत:चे विमान खरेदी करण्याची इच्छा असूनही तेवढे पैसे नसल्याने मी स्वतःचे विमान घेऊ शकत नसल्याचे शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितले.

मिळकतीचा सर्व पैसा चित्रपट बनविण्यासाठी खर्ची होत असल्याने विमान खरेदी करण्याइतके पैसे माझ्याकडे उरत नाहीत. स्वत:च्या विमानातून प्रवास करण्यास मला खूप आवडेल, कारण त्यामुळे मला आणखी काम करता येईल.

एकवेळ अशी येते की माझ्याजवळ खूप पैसे असतात पण ते खर्च करताना स्वत:चे विमान किंवा चित्रपट असे दोन पर्याय माझ्यासमोर असतात. यातील चित्रपट हा पर्याय मी नेहमी निवडतो आणि नव्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व मिळकत खर्च करतो. विमान खरेदी करण्याची इच्छा तशीच राहून जाते, असे शाहरुख म्हणाला.

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांची स्वत:च्या मालकीची ‘रेड चिलीज एण्टरटेन्मेंट’ ही चित्रपट निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून शाहरुखने अनेक बिग बजेट चित्रपटांची निर्मिती केली आहे

Story img Loader