अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती कायम आपले फोटोज, डान्स करतानाचे व्हिडिओज, काही आठवणी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ती बराच काळ चर्चेत राहिली. तिने कालच इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यात तिने आपले काही अनुभव आणि त्यांचा तिच्या मानसिक स्थितीवर झालेला परिणाम याबद्दल सांगितलं आहे.

अंकिताचं हे लाईव्ह सेशन ट्रोलिंग आणि ऑनलाईन होणारी शिवीगाळ या संदर्भात होतं. यात तिने अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत असलेल्या आपल्या अफेअरबद्दलही सांगितलं. त्याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिला डिप्रेशनचा सामना करावा लागला आणि कशी ती त्यातून बाहेर आली तसंच तिच्या नृत्यकलेनं, डान्सच्या व्हिडिओजमुळे तिला कसा आनंद वाटतो याबद्दल ती बोलत होती. यावेळी तिने तिच्या चाहत्यांना सकारात्मकतेचा संदेशही दिला.

तिने तिच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलं की तिला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत आहे. पण तसं वाटायचं खरंतर काही कारण नाही. म्हणून तिने यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि आपली विचार प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला. तिला तिचा आनंद डान्समधून मिळतो. म्हणून ती आपल्या डान्सचे व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिच्या काही फॉलोवर्सकडून तिला खूप घाण कमेंट्स येत असल्याचं तिने सांगितलं. तुम्हाला जर माझ्यामुळे इतका त्रास होत आहे, तरी तुम्ही मला का फॉलो करत आहात असा सवालही तिने या ट्रोलर्सला विचारला आहे. तिने सांगितलं की, या ट्रोलिंगमुळे माझ्यावर काही परिणाम होत नसला तरी माझे आईवडील ज्यांचा या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही, त्यांना या गोष्टीचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहू नका पण मला मात्र त्या व्हिडिओजमधून आनंद मिळतो.

सुशांतसिंह राजपूतसोबतच्या नात्याबद्दल ती म्हणाली की, “कोणाचंही नातं आपण जज करू शकत नाही. आणि जर तुम्ही ते करत असाल तर तेव्हा तुम्ही कुठे होतात जेव्हा आमचं नातं संपुष्टात आलं?”  सुशांतशी ब्रेकअप करण्यावरूनही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं, त्यावर ती म्हणाली, “त्याची स्वप्न मोठी होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या वाटेने निघून गेला, यात माझी काय चूक? त्यावरून तुम्ही मला का शिवीगाळ करत आहात? तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहित नाही आणि मी ते सांगू इच्छित नाही. त्यामुळे आमच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरणं बंद करा. या ब्रेकअपमुळे काही काळ डिप्रेशनमध्येही गेले होते.” लोकांनी तिला काम नसल्यामुळं ट्रोल केलं याबद्दलही ती बोलली.

Story img Loader