आजच्या घडीला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याचे फॅन फॉलोइंग मोठे असले तरी या सगळ्याची सुरूवात शाळेत असतानाच झाली होती. रणवीरच्या मजेशीर स्वभावामुळे तो शाळेतील मुलींमध्ये चांगलाच लोकप्रिय होता. रणवीरने काही दिवसांपूर्वी त्याच्या शाळेतील वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने शाळेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तू शाळेतील मुलींमध्ये लोकप्रिय होतास का, असा प्रश्न यावेळी रणवीर सिंगला विचारण्यात आला. या प्रश्नाला हसत हसत उत्तर देताना रणवीर म्हणाला की, हो मी मुलींमध्ये लोकप्रिय होतो. मी नेहमीच काही ना काही करून दाखवत असे. त्यामुळे मी शाळेतील लोकप्रिय लोकांपैकी एक होतो. मी त्यावेळी इतरांना दमदाटी करायचो आणि त्यांच्या खोड्या काढायचो, असे रणवीरने या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
दरम्यान, रणवीरच्या उपस्थितीमुळे शाळेच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती. यावेळी रणवीर त्याचे जुने शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना भेटला. या कार्यक्रमात रणवीरसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. रणवीर सिंगनेही आपला मोठेपणा बाजूला ठेवत शिक्षक आणि मुलांसोबत सेल्फी काढले.
‘शाळेत असताना मी मुलींचा आवडता होतो’- रणवीर सिंग
मी त्यावेळी इतरांना दमदाटी करायचो आणि त्यांच्या खोड्या काढायचो
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-01-2016 at 17:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was popular among girls in school ranveer singh