आजच्या घडीला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याचे फॅन फॉलोइंग मोठे असले तरी या सगळ्याची सुरूवात शाळेत असतानाच झाली होती. रणवीरच्या मजेशीर स्वभावामुळे तो शाळेतील मुलींमध्ये चांगलाच लोकप्रिय होता. रणवीरने काही दिवसांपूर्वी त्याच्या  शाळेतील वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने शाळेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तू शाळेतील मुलींमध्ये लोकप्रिय होतास का, असा प्रश्न यावेळी रणवीर सिंगला विचारण्यात आला. या प्रश्नाला हसत हसत उत्तर देताना रणवीर म्हणाला की, हो मी मुलींमध्ये लोकप्रिय होतो. मी नेहमीच काही ना काही करून दाखवत असे. त्यामुळे मी शाळेतील लोकप्रिय लोकांपैकी एक होतो. मी त्यावेळी इतरांना दमदाटी करायचो आणि त्यांच्या खोड्या काढायचो, असे रणवीरने या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
दरम्यान, रणवीरच्या उपस्थितीमुळे शाळेच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती. यावेळी रणवीर त्याचे जुने शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना भेटला. या कार्यक्रमात रणवीरसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. रणवीर सिंगनेही आपला मोठेपणा बाजूला ठेवत शिक्षक आणि मुलांसोबत सेल्फी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा