सध्या सर्वत्र फिफा वर्ल्ड कप फिव्हर सुरु आहे. यापासून बॉलीवूड ते मराठी चित्रपटसृष्टीही दुरावलेली नाही.  राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालनने आपण फुटबॉ़लचे चाहते असल्याचे नुकतेच सांगितले.  मात्र, तिचे हे फुटबॉल प्रेम केवळ अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू  लायनेल मेस्सीपुरता मर्यादित आहे.
“मी फक्त मेस्सीला ओळखते कारण तो खूप देखणा दिसतो. माझी मित्रमंडळी मला मेस्सी खेळत असल्यावर सांगतात. फक्त तेव्हाच मी टीव्ही लावून मॅच बघते…. नाहीतर मला फुटबॉलमध्ये अजिबात रुची नाही,” असे विद्या आगामी चित्रपट ‘बॉबी जासूस’च्या प्रमोशवेळी म्हणाली. यावेळी विद्याने बंगाली चित्रपटांचे सुपरस्टार प्रसोनजीत चॅटर्जी यांची भेट घेतली. आम्ही दोघही एकमेकांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत मात्र योग्य पटकथेची वाट पाहत असल्याचे विद्या म्हणाली.
विद्याचा ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा