पीळदार शरीरयष्टीमुळे अनेकांचा आवडता अभिनेता जॉन अब्राहम याने दुसऱ्यांच्या लग्नात नाचायला मला आवडत नाही आणि ते माझ्या तत्त्वातही बसत नाही, असे सांगत लग्नात नाचणे म्हणजे आपल्या हाताने आपली प्रतिष्ठा कमी करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वझीर’मध्ये जॉन अब्राहमने भूमिका साकारली होती. तो म्हणतो, एका मुद्द्यावर मी कायम ठाम राहतो. त्यावरून माझ्याशी कोणाचे मतभेद झाले तरी हरकत नाही. पण दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन नाचायला मला आवडत नाही. तसं करणं म्हणजे आपल्या हातानेच आपली प्रतिष्ठा कमी करण्यासारखे आहे, असे मला वाटते. दुसऱ्याने एखाद्या ब्रॅंडबद्दल मला काही सांगितले म्हणून लगेचच मी त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही. मला स्वतःहून ज्या ब्रॅंड्सवर विश्वास आहे. त्याच्यांसाठीच काम करायला मी तयार असतो, असेही त्याने स्पष्ट केले.
‘रॉकी हॅण्डसम’ या चित्रपटाच्या तमीळ आणि तेलगूमधील रिमेकसाठी जॉन सध्या काम करतो आहे. आपल्या कामामध्ये कायम व्यग्र असल्यामुळे जॉन बॉलीवूड पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्येही फार कमी दिसतो.

Story img Loader