‘लॉरिएल’ ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करणारी कतरिना पहिल्यांदाच त्यांच्या वतीने ‘कान’च्या रेड कार्पेटवर येणार असल्याने त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कतरिनाला जाहीरपणे रणबीर आणि तिच्या विवाहाविषयी विचारण्याची संधी माध्यमांना मिळाली आहे. मात्र या प्रश्नावर नेहमीच वैतागणाऱ्या क तरिनाने सध्या तरी आपला पवित्रा बदलला आहे. मी लपूनछपून विवाह करणार नाही, असे आश्वासन कतरिनाने प्रसार माध्यमांना दिले आहे. ‘कान’च्या निमित्ताने ‘लॉरिएल’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कतरिना आणि सोनम कपूर एकत्र आल्या होत्या. त्या वेळी कतरिनाला रणबीरबरोबरचे प्रेमसंबंध या वर्षी वैवाहिक नात्यात बदलणार का, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हाही कतरिना चिडली नाही. मात्र या प्रश्नावर किंचित गोंधळलेल्या कतरिनाला मदत करण्यासाठी सोनम कपूर पुढे आली. माझे लग्न झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्धार कतरिनाने केल्याचे सांगत सोनमने प्रसंग निभावण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी कतरिनाने आपण माध्यमांपासून लपूनछपून विवाह करणार नसल्याचे स्पष्ट केले. अर्थात, कतरिनाच्या या आश्वासक उत्तरामागे सध्या ‘कपूर’ खानदानाकडून तिला मिळत असलेले प्रेम आणि स्वीकृती कारणीभूत ठरली असल्याचे बोलले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये कतरिनाने नीतू कपूर यांचे मन जिंकून घेतले आहे. त्यापाठोपाठ ऋषी कपूर आजारी असतानाही कतरिना कायम कपूर कुटुंबीयांच्या सेवेत होती. ऋषी कपूर यांनी नुकतीच ट्विटरवर रणबीर आणि कतरिना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते. नुकत्याच झालेल्या त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यातही कतरिनाला दागिने देऊन हे नातेसंबंध पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
विवाह लपूनछपून करणार नाही
‘लॉरिएल’ ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करणारी कतरिना पहिल्यांदाच त्यांच्या वतीने ‘कान’च्या रेड कार्पेटवर येणार असल्याने त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कतरिनाला जाहीरपणे रणबीर आणि तिच्या विवाहाविषयी विचारण्याची संधी माध्यमांना मिळाली आहे.
First published on: 30-04-2015 at 07:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will not marry secretly says katrina kaif