बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मिनिषा लांबा ही कायमच चर्चेत असते. मिनिषाने‘यहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘कुतुब मीनार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी मिनिषाने नुकतंच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने चित्रपटाच्या निवडण्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकतंच मिनिषाला कुतुब मीनार या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली, “मी आता ज्या विषयावरील चित्रपटात काम करत आहे, तसा चित्रपट आतापर्यंत बॉलिवूड किंवा हॉलिवूड यासारख्या कोणत्याही सिनेसृष्टीत बनलेला नाही. कुतुब मीनार हा चित्रपट एका नवीन विषयावर निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे शूटींग उत्तराखंडमध्ये झाले आहे. या ठिकाणी आमच्या फोनला अजिबात नेटवर्क नव्हते. त्यामुळे इंटरनेट, सोशल मीडिया यापासून आम्ही फार दूर झालो होतो. मात्र यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांच्या जवळ आलो. आम्ही तिथे प्रचंड मस्ती केली. यात माझ्यासोबत करणवीर बोहरा, संजय मिश्रा, त्रिधा चौधरी असे कलाकारही पाहायला मिळणार आहेत,” असे तिने सांगितले.

यावेळी तिला सिनेसृष्टीतील करियरबद्दल विचारण्यात आले असता ती म्हणाली, “जेव्हा माझे सिनेसृष्टीतील करिअर सुरु झाले, तेव्हा मला ज्या चित्रपटाची ऑफर आली ते मी करत होती. पण मला असा कोणताही चित्रपट करायचा नाही जो केल्यानंतर मला तो चित्रपट साईन केल्याचे दु:ख वाटेल. त्यामुळे असा चित्रपट जितके कमी प्रेक्षक पाहतील तितके चांगले आहे. कारण मला आता असे चित्रपट करायचे आहे ज्याचे चित्रीकरण करतेवेळी मला स्वत:ला अभिमान वाटेल,” असेही तिने म्हटले.

‘या’ अभिनेत्रीवर होता चोरीचा आरोप, घर मालकीणीने देखील दाखवला होता बाहेरचा रस्ता

“कारण शूटिंग करताना मला अभिमान वाटेल असे चित्रपट करायचे आहे. मी करत असलेला चित्रपट मी एन्जॉय करत आहे. तो लोकांनाही आवडेल, असे जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी कोणताही चित्रपट करणार नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक काय निर्णय घेतील? तो लोकांना आवडेल की नाही? हा वेगळा मुद्दा आहे. पण जोपर्यंत मला तो चांगला चित्रपट वाटत नाही. तोपर्यंत मी तो करू शकत नाही. सध्या मी एक कोल्ड मेस नावाचा एक शो करत आहे. जो रिलेशनशिपबद्दल असेल,” असे तिने सांगितले.

Story img Loader