एरव्ही आडूनआडून शाहरूख खानला नेहमी सलमानबरोबर काम करण्याविषयी विचारले जाते. शनिवारी ‘मन्नत’वर बॉलिवूडच्या किंग खानने आपला ४८ व्या वाढदिवशी, सलमानबरोबर काम करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. सलमानचे यावर काय म्हणणे आहे हे मलाही माहीत नाही. पण, आमच्यासाठी जर चांगली पटकथा असेल तर मी नक्कीच काम करेन, असे शाहरूख यावेळी म्हणाला.
‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या रेकॉर्डब्रेक यशामुळे सध्या आनंदी असणाऱ्या शाहरूख खानने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसासाठी माध्यम प्रतिनिधींना ‘मन्नत’वर आमंत्रित केले होते. यानिमित्ताने, शाहरूखने ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे यश, त्याचे ‘ड्रीम रोल’ अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. मात्र, बॉलिवूडचा हा बादशाह जसजसा पन्नाशीकडे झुकू लागला आहे तसतसा त्याच्या विचारांमध्ये होत असलेला बदलही यावेळी स्पष्टपणे जाणवून गेला.

Story img Loader