सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते.

चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे, पण त्यातील एका ठिकाणी आलेला उल्लेख यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर हे भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आल्याने बऱ्याच लोकांनी याचा विरोध करायला सुरुवात केली.

Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता

आणखी वाचा : “नोलन हा एकमेव दिग्दर्शक आहे जो…” ‘ओपनहायमर’चं कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी खेचले बॉलिवूडचे कान

काही लोकांनी आपल्या सर्टिफिकेशन बोर्डावरही लोकांनी ताशेरे ओढले असून सेन्सॉरने असे सीन्स पास कसे केले असा सवालही केला आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही यावर भाष्य केलं आहे. सेन्सॉरकडून असा सीन दाखवण्यासाठी मंजूरी तरी कशी मिळाली असा सवालही अनुराग ठाकूर यांनी केला आहे. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार अनुराग यांनी सीबीएफसीला याबद्दल चांगलंच खडसावलं आहे.

इतकंच नव्हे तर हा सीन लवकरात लवकर चित्रपटातून हटवण्याबद्दलही अनुराग ठाकूर यांनी दबाव आणल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच चित्रपटातील या सीनवर कात्री चालू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाला पाहिल्याच दिवशी भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून याचं कौतुक होत आहे. नोलनच्या या बहुचर्चित चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader