अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच ‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोच्या पहिल्या भागात हजेरी लावली होती. आलियासोबत या शोमध्ये रणवीर सिंगने हजेरी लावत धमाल उडवून दिली. आलिया आणि रणवीर दोघांनी देखील या शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील आणि सिनेसृष्टीतील अनेक किस्से शेअर केले. यावेळी आलियाने सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबद्दलचा एक मजेशीर किस्सा शेअऱ केला.

‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोमध्ये आलियाला रॅपिड फायर राउंडमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. ‘हा सिनेमा पाहून कुणी सर्वात चांगली कॉम्प्लिमेंट दिली’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावेळी आलियाने चक्क इब्राहिम अली खानचं नाव घेतलं. यावेळी इब्राहिमने केलेला मेसेजही वाचून दाखवला.

आलिया भट्टने सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला खास फोटो

इब्राहिमने केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, “तुला पर्सनल मेसेज करण्यासाठी मला खास वेळ काढावा लागला. गंगुबाई सिनेमा पाहून मला विश्वासच बसला नाही की ही तिच मुलगी काही जिच्याकडून मी सेटवर रोज काही तरी शिकत असतो. तू खरचं हुशार आहेस. गंगुच्या रुपात तू सुंदर दिसली आहेस. तू कोणतीही भूमिका उत्तमपणेच साकारते. एखाद्या भांड्यात पाण्याने आकार घ्यावा तसं तू भूमिकेशी एकरुप होतेस. खूपच मस्त, देशातील बेस्ट अभिनेत्री”आलियाने इब्राहिम अली खानचा हा मेसेज वाचून दाखवल्यानंतर करण जोहर आणि रणवीर जोरजोरात हसू लागले. तर इब्राहिम खूपच क्यूट असल्याचं आलिया म्हणाली.


रणवीर सिंग आणि आलिया लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात झळकणार आहेत. तर इब्राहिम अली खान या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

Story img Loader