प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधायला हवेच असे नाही. त्यापेक्षा वस्तुस्थिती स्वीकारावी.. सई ताम्हणकर २०१३ मध्ये दोन-चार नव्हे तर तब्बल आठ चित्रपटांतून आपल्याला दिसणार. त्यात दोन हिंदी आहेत (त्यातील भूमिका ‘गजनी’एवढय़ा नकोत, अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.. ‘गजनी’त सई नेमकी कधी होती याचा विचार करू नका.)  ‘बालक पालक’ या नवीन वर्षांच्या पहिल्याच शुक्रवारी झळकणाऱ्या चित्रपटात ती आहे. त्यानंतर ‘झपाटलेला-२’, ‘अनुमती’, ‘व्हिला’, ‘दुनियादारी’ वगैरे वगैरे चित्रपटांतून ती दिसेल/चमकेल.
‘सनई चौघडे’पासून तिला भेटतोय. तिचा आत्मविश्वास व सौंदर्य असे दोन्ही वाढले  असे म्हणावे की दोन्ही एकमेकांमुळे वाढल्याचे
जाणवते म्हणावे कळत नाही. त्यापेक्षा तिच्या अभिनयात सुधारणा झाली हे ‘सही’ झाले ना?    

Story img Loader