नुकतेच निधन पावलेले प्रख्यात गायक मन्ना डे आणि पं. रवी शंकर यांना भारतातील ४४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे. गोव्यात साजरा करण्यात येणारा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते ३० नोव्हेंबर असा १० दिवस चालणार आहे.
महोत्सवाच्या परंपरेनुसार, चित्रपटसृष्टीतील मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करण्यात येते. यावेळी त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी आणि हितचिंतकांना आमंत्रित करण्यात येते. मन्ना डे आणि रवी शंकर यांच्यासोबत दिग्दर्शक रितुपर्णा घोष, अभिनेत्री सुकुमारी, संगीत दिग्दर्शक लालगुडी झाबवाला, दक्षिण कोरियातील दिग्दर्शक पार्क छुल सू आणि रशियन सिनेमॅटोग्राफर वादिम यूसोव्ह यांनाही श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा