मुंबईपासून जवळचं असलेल्या इगतपुरीमध्ये नाशिक पोलिसांनी एका बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या कारवाईत १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना अटक केली होती. रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांची नावं समोर आली असून, यात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी पहिला व पुरूष मादक द्रव्यासह नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कारवाई केली होती. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल रेव्ह पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन केलं जात होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते.

संबंधित वृत्त- इगतपूरी : रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; फिल्म इंडस्ट्रीतील ४ महिलांचा समावेश

पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत सहभागी झालेल्या १० पुरुष आणि १२ महिला अशा एकूण २२ जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पार्टीतील लोकांबरोबरच स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री व बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा- लस घेताना ‘या’ मराठी अभिनेत्रीचा ड्रामा, नेटकरी म्हणाले…

कोण आहे हिना पांचाळ?

हिना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जास्त लोकप्रिय असली, तरी ‘बिग बॉस मराठी’मुळे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Igatpuri rave party heena panchal news bigg boss marathi fame heena panchal arrested nashik igatpuri high profile rave party bmh