फ्लोरिडातील टम्पा बे येथे अलिकडेच पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार सोहळ्यात’ आनंद राय यांच्या ‘रांझना’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केलेल्या अभिनेता धनुषला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रेक्षकांनी बोलूच दिले नाही. ‘कोलावरी डी’ हे धनुषचे प्रसिध्द गाणे त्याच्या तोंडून चाहत्यांना ऐकायचे होते आणि त्यासाठी ते सतत धनुषकडे अाग्रह करत राहिले.
तीन वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने सर्वत्र कमालीचा धुमाकूळ घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठावर हेच गाणे होते. हे गाणे धुनषने स्वत: लिहिले असून, त्याने स्वत:चं ते गायलेदेखील आहे. आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे, हे पाहून धनुष भारावून गेला. याविषयीच्या टि्वटमध्ये तो म्हणतो, ‘प्रेक्षकांनी मला बोलूच दिलं नाही. मी ‘कोलावरी’ गाणे गावे यासाठी प्रेक्षकांनी आग्रह धरला… गाण्याच्या काही ओळी गाणे भाग पडले…’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा