‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात व्यस्त असलेला शाहरूख खान लवकरच ‘यश राज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘फॅन’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. चित्रपटातील मुख्य स्त्री भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत असली, तरी अभिनेत्री इलियाना डिक्रुझने ही भूमिका पटकावल्याचे समजते. जर हे खरे ठरले, तर ‘बर्फी’ या अनुराग बासूच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इलियानाचा शाहरूखबरोबरचा हा पहिला चित्रपट ठरेल. या भूमिकेसाठी ‘शुध्द देसी रोमान्स’च्या वाणी कपूरपासून परिणिती चोप्रापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आहेत. अलिकडेच वाणी कपूरने आपण ‘यश राज फिल्म्स’चा चित्रपट करत असल्याचे म्हटले होते. परंतु, चित्रपटाविषयी अधिक काही सांगण्यास तिने नकार दिला होता. ‘बर्फी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इलियानाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर तिने शाहिद कपूरबरोबर ‘फटा पोस्टर निकला हिरो’ आणि वरूण धवनबरोबर ‘मै तेरा हिरो’ चित्रपटात अभिनय केला होता. सैफ अली खान आणि कल्की कोचलिनच्या भूमिका असलेल्या ‘हॅपी एण्डिंग’ चित्रपटाच्या शेवटच्या सत्राच्या चित्रिकरणात सध्या ती व्यस्त आहे. राज निधिमोरू आणि क्रिश्ना डी.के. हे ‘हॅपी एण्डिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
हबीब फैझल लिखित ‘फॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा करत आहे. चित्रपटात एका चाहत्याची आपल्या आदर्श व्यक्तिला भेटणासाठीची धडपड पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा