जेव्हा अरिन आणि रायन या आपल्या मुलांच्या आरोग्याचा विषयी येतो, तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित ही एक शिस्तप्रिय आई असते. मुले कितीही दमलेली असली तरी रात्री त्यांना दात घासल्याशिवाय आपण झोपायला देत नसल्याचे तिने सांगितले. आपल्या मुलांनी दिवसात दोनदा दात घासण्याबाबत आपण कठोर असल्याचे ती म्हणते. ते कितीही थकलेले असले किंवा बर्थडे पार्टीवरून त्यांना यायला कितीही उशीर झाला, तरी आपण त्यांना दात घासल्याशिवाय झोपायला देत नसल्याचे तिने सांगितले. मुलांनी प्रत्येक दिवशी सकाळी आणि रात्री दोन मिनिटे दात घासणे महत्वाचे असल्याचे तिचे मानणे आहे. माधुरी दिक्षित ही दातांशी संबंधीत भारतीय बाजारातील ‘ऑरल बी’ या ब्रेण्डच्या उत्पादनांशी सल्लग्न आहे. भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेला महत्व असल्याचे मानणारी माधुरी म्हणते, कुटुंब आरोग्यदायी असणे गरजेचे आहे. एक निखळ हास्य आनंदी कुटुंबाचे प्रतिक आहे. त्यामुळेच एक चांगले हास्य कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे. १९८४ च्या ‘अबोध’ चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या माधुरीने ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘परिंदा’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ सारख्या अनेक यशस्वी चित्रपटातून अभिनय केला. नजाकतभऱ्या नृत्याने आणि मोठ्या पडद्यावरील मोहक अदाकारीने तिने चाहात्यांच्या हृदयात स्थान मिळवले. तर, तिच्या स्मित हास्याचे लोखो चाहते असल्याचे सर्वश्रृत आहे. ‘गुलाब गॅंग’ हा माधुरीचा शेवटचा चित्रपटात होता. जेव्हा आपण आगामी चित्रपट स्विकारू, तेव्हा त्याबाबत लोकांना अवगत करण्याचे तिने बोलून दाखवले.

Story img Loader