अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन यांच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच बॉलीवूडमध्ये आणखी जोडीच्या घटस्फोटाची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या बातमीनुसार, ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यात दुरावा निर्माण झाला असून ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
“ओके…. ठिक आहे मी मानतो मी घटस्फोट घेणार आहे. धन्यवाद मला याबाबत सांगितल्याबद्दल… आता मला तुम्ही हे ही सांगा का की मी दुसरं लग्न कधी करणार आहे? धन्यवाद….”, असे अभिषेकने ट्विट केले आहे. कान चित्रपट महोत्सवासाठी ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासोबत जाताना दिसली. त्यावेळेस अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत नसल्याने या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चेला आणखीनच उधाण आले होते. मात्र, अभिषेक शिमला येथे चित्रीकरणात व्यस्त होता. पण त्याने आता आपले काम पुढे ढकलले असून, तो २२ मे ला द फाउंडेशन फॉर एड्स रिसर्चच्या गालामध्ये ऐश्वर्यासोबत दिसेल.

Story img Loader