IMDB Most Anitcipated Movie 2025 : २०२५ वर्ष सुरू झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर त्यांचे आवडत्या स्टार्सचे किंवा आधीच घोषणा झालेले अनेक सिनेमे आहेत ज्याची सिनेप्रेमी मनापासून वाट बघत आहेत. बॉलीवूड, दाक्षिणात्य अशा दोन्ही सिनेसृष्टीतील अनेक सिनेमे आहेत ज्याची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशा २० सिनेमांची यादी IMDb या चित्रपट , टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने २०२५ च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या २५ कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निश्चित करण्यात आले आहे.

सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सलमान खानचा ‘सिकंदर’ सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. ए. आर. मुरुगदोस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी म्हटले, “२०२५ च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत सिकंदर चित्रपटाला पहिल्या स्थानी पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. सलमान खानबरोबर काम करणे खूप खास होते.”

Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Hindenburg Research winds down
Hindenburg Research : अदाणी समूहाबाबत अहवाल देऊन खळबळ माजवणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चला कुलूप, संस्थापकांनी लिहिली भावूक पोस्ट
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
imdb rating what is internet movie database all tou need to know
IMDb म्हणजे काय? यावरुन चित्रपट हिट की फ्लॉप, कलाकारांची लोकप्रियता कशी ठरते? जाणून घ्या…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा…‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केजीएफ फेम अभिनेता यशचा ‘टॉक्सिक’ सिनेमा आहे. अलीकडेच या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही दाक्षिणात्य चित्रपट आहे. तिसऱ्या क्रमांकावर रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट आहे. तर चौथ्या क्रमांकावर ‘हाऊसफुल ५’ चित्रपट आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून यात अक्षय कुमारसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांसहअनेक स्टारच्या मुख्य भूमिका आहेत. तर या यादीतपाचव्या क्रमांकावर टायगर श्रॉफचा ‘बागी ४’ हा सिनेमा आहे..

IMDb 2025 Most anticipated movie list
सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सलमान खानचा ‘सिकंदर’ सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. ए. आर. मुरुगदोस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.(Photo Credit – IMDb)

२०२५ चे IMDb वरील सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट:

१ सिकंदर
२. टॉक्सिक
३. कूली
४. हाऊसफुल ५
५. बाग़ी ४
६. राजा साब
७. वॉर २
८. L2: एंपुरान
९. देवा
१०. छावा
११. कन्नप्पा
१२. रेट्रो
१३. ठग लाईफ
१४. जाट
१५. स्काय फोर्स
१६. सितारे जमीन पर
१७. थामा
१८. कंतारा ए लीजंड: चॅप्टर १
१९. अल्फा
२०. थांडेल

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…

या यादीतील २० सिनेमांपैकी ११ हिंदी चित्रपट आहेत, त्यातील तीन तमिळ व तेलुगू आहेत, तर दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. या यादीतील ‘हाऊसफुल ५’, ‘कन्नाप्पा’ आणि ‘स्काय फोर्स’ या तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत आहे. तर रश्मिका मंदानासुद्धा या यादीतील ‘सिकंदर’ , ‘छावा’ आणि ‘थामाया’ या तीन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या यादीतील पाच चित्रपट प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा पुढील भाग आहेत. त्यात ‘हाऊसफुल ५’ , बागी ४ , वॉर २ , सितारे ज़मीं पर , आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर १ या चित्रपटांचा समावेश आहे.

Story img Loader