करीना कपूरचा ‘खान’दानात प्रवेश झाल्यापासून कितीही नाही म्हटले तरी तिच्या चित्रपटातील असण्यापासून दिसण्यापर्यंत अनेक गोष्टींवर र्निबध आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत करीनाच्या पदराआडून ‘मी नाही हो त्यातला’ म्हणणाऱ्या सैफने ती ह्रतिकबरोबर चित्रपट करणार म्हटल्यावर पदर सोडून बाहेर येत ‘नाही.नाही..’चा पाढा सुरू केला आहे. क रीना, सैफ, करण जोहर, ह्रतिक हे सगळे एकाच मित्रपरिवारातले. ह्रतिक तसा प्रेमप्रकरणांसाठी फारसा नावाजलेला नाही. तरीही करीनाने ह्रतिकबरोबर चित्रपट करू नये, असा धोशा सैफने लावला आहे. करीनाकडे दोन चित्रपटांचे प्रस्ताव होते. एकात ह्रतिक तिचा नायक असणार आहे तर दुसऱ्यात इम्रान हाश्मी. इम्रान हाश्मीच्या चित्रपटाला करीनाकडून होकारही मिळाला पण, सैफच्या हट्टापायी ह्रतिकबरोबरच्या चित्रपटाला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही.
ह्रतिक रोशन आणि करीना कपूर ही जोडी कभी खुशी कभी गम, मै प्रेम की दिवानी हूॅं, यादें, मुझसे दोस्ती करोगे अशा चित्रपटांमधून एकत्र आली होती. त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री अफलातून होती. त्यामुळे पुढच्या काळात बॉलिवूडच्या लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडय़ांमध्ये त्यांची गणती होईल, अशी चर्चा होती. त्यात सूरज बडजात्यांच्या ‘मै प्रेम की दिवानी हूँ’ या चित्रपटात फारच रोमँटिक दृश्ये दिली होती त्यामुळे त्या दोघांचे अफेअर आहे, अशा वावडय़ा तेव्हा उठल्या होत्या. त्यानंतर या दोघांनीही एकत्र काम केले नव्हते. आता एका गॅपनंतर पुन्हा या जोडीला एकत्र आणायचे अशी करण जोहरची इच्छा होती. त्याने तशी पटकथाही निवडली. पण, हे दोघे पुन्हा एकत्र आले तर जुन्या अफेअरच्या गोष्टी ताज्या होतील, असे सैफला वाटत असून त्याला ते मान्य नाही. म्हणूनच, करीना ह्रतिक बरोबर काम करणार नाही, असे जाहीर करून तो मोकळा झाला आहे.
करणच्या या चित्रपटात ह्रतिक असणारच हे निश्चित आहे. त्यामुळे सैफचे मन वळवण्याचा प्रयत्न करण करणार असल्याचे समजते. मात्र, तोही प्रयत्न निष्फळ ठरला तर करीनाऐवजी दुसरा पर्याय शोधला जाणार आहे. ‘सिरीअल किसर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या इम्रानबरोबर करीनाने काम केले तरी सैफला चालणार आहे पण, करीना आणि ह्रतिकची जोडी पडद्यावर जमली तर तिच्याबरोबरच्या आपल्या जोडीचा प्रभाव कमी होईल, असे त्याला वाटत असल्याने त्याचा विरोध कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा