करण जोहरची निर्मिती असणारा ‘गोरी तेरे प्यार में’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ आपटल्यानंतर अभिनेता इमरान खान आणि चित्रपटनिर्माता करण जोहर यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांत रंगल्या होत्या. मात्र, इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका या दोघांशी आपले अत्यंत चांगल्याप्रकारचे व्यवसायिक आणि वैयक्तिक संबंध असल्याचे सांगत करण जोहरने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘गोरी तेरे प्यार में’ तिकीटबारीवर साफ आपटल्यानंतर करण आणि इमरान यांच्यातील वाद इतके टोकाला गेले होते की, इमरानने या चित्रपटाच्या मानधनापोटी देण्यात आलेला धनादेशसुद्धा परत देण्याची तयारी दाखवली होती.  मात्र, आपल्या दोघांविषयी बाहेर चुकीच्या बातम्या पसरविण्यात आल्याचे सांगत करणने इमरान खानशी आपला कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. इमरानची पत्नी अवंतिका येत्या काही दिवसांतच त्यांच्या बाळाला जन्म देणार असून, त्यांचे येणारे बाळ सुखरूपरित्या जन्माला यावे अशा शुभेच्छा करण जोहरने दोघांना दिल्या आहेत. यापूर्वी इमरान खानने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘एक मै और एक तुम’ या चित्रपटांत काम केले आहे.   

Story img Loader