बॉलीवूड अभिनेता इम्रान खानची पत्नी अवंतिका लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. मात्र, या पहिल्यावहिल्या बाळंतपणात अवंतिका उत्सुक नाही तर वैतागली असल्याचे समजत आहे. इम्रान खान याने २०११ साली आपली बालमैत्रीण अवंतिकाशी विवाह केला. येणा-या जून महिन्यात इम्रान-अवंतिका दाम्पत्य आपल्या पहिल्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अवंतिकांच्या पोटात बाळ असल्यामुळे तिचे वजन वाढले आहे, हातापायांना सुज आली आहे, त्यामुळे अवंतिकाच्या पहिल्यावहिल्या बाळंतपणातील उत्सुकतेची जागा वैतागाने घेतली असल्याचे इम्रानने सांगितले. अवंतिकांची तब्येत चांगली असली तरी तिला या सगळ्यातून लवकरात लवकर मोकळे व्हावेसे वाटत असल्याचे इम्रान खानने सांगितले. चित्रपटांच्या आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून इम्रान खानसुद्धा अवंतिकाला सोबत करत आहे. माझ्यासाठी माझे कुटुंब नेहमीच महत्वाचे राहिले असून माझ्या कुटुंबाविषयीच्या जबाबदा-या चांगल्याप्रकारे पूर्ण करता येतील यासाठी प्रयत्न करत असल्याचे इम्रान खान याने सांगितले.      

Story img Loader