बॉलीवूड अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या घरी ९ जूनला कन्यारत्नाचे आगमन झाले होते. इमरानने त्याच्या मुलीचे नाव इमारा मलिक खान असे ठेवले आहे.
दरम्यान, मुलीच्या नावाबाबत इमरानला थोडी काळजी वाटत होती. मात्र, अखेर इमारा हे नाव ठेवण्यात आले. इमारा या नावाचा अर्थ मजबूत आणि दृढनिश्चयी असा होतो. १० वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर २०११ साली इमरानने प्रेयसी अवंतिकासोबत विवाह केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरानने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो आपल्या लाडक्या मुलीला वेळ देण्यात गुंतला आहे. तो दोन महिन्यानंतर कामास सुरुवात करणार आहे.  

Story img Loader