तिग्मान्शु धुलियाच्या ‘मिलन टॉकीज’ चित्रपटात इमरान खानऐवजी शाहीद कपूरला घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’ चित्रपटात झळकलेल्या इमरानने वर्षाभरापूर्वी ‘मिलन टॉकीज’ चित्रपटासाठी होकार दिला होता. पण, आता त्याच्याऐवजी शाहीदला चित्रपटात घेण्यात आल्याची चर्चा आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असून ती छोट्या शहरातील मुलीची भूमिका करणार आहे. जर सूत्रांनी दिलेली माहिती खरी ठरली तर ‘तेरी मेरी कहानी’ चित्रपटानंतर प्रियांका-शाहीदची जोडी त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे.
पण, दिग्दर्शक धुलिया याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Story img Loader