गेल्या काही दिवसांपासून विकास बहल हे नाव त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे चर्चेत आलं आहे. कंगना, ननयी दीक्षितसह एका महिलेनं दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात पूर्वी आवाज न उठवल्याबद्दल अभिनेता इम्रान खाननं आता पश्चाताप व्यक्त केला आहे. विकास बहलच्या असभ्य वर्तनाची मला कल्पना होती मला तीन अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करताना आलेला वाईट अनुभव सांगितला होता पण मी तेव्हा गप्प बसलो, याचाच मला खूप त्रास होत असं इम्रान म्हणाला.

इम्रान आमिर खानचा भाचा आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं पहिल्यांदाच विकास बहल विरोधात आवाज उठवला आहे. ‘विकास सेटवर अभिनेत्रींना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा, असभ्य वर्तन करायचा तुम्हाला चित्रपटात संधी दिली तर मला त्याबदल्यात काय मिळणार असं थेट विचारायचा, विकास बद्दलचे असे कित्येक वाईट अनुभव तीन अभिनेत्रींनी मला येऊन सांगितले.

पण त्यावेळी मी कोणतीच मदत त्यांना करू शकलो नाही. याविरोधात आवाज उठवला पाहिजे असं मी या क्षेत्रातल्या काही लोकांना बोलूनही दाखवलं मात्र मला सर्वांनीच गप्प राहण्याचा सल्ला दिला. माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता ही भीती मला सारखी वाटायची. या क्षेत्रातल्या अनेकांना विकास बहलबद्दल माहिती होतं, पण अनेकांनी यावर गप्प बसण्याचा पर्याय स्विकारला.

ज्या अभिनेत्रींना विकासच्या असभ्य वागण्याला तोंड द्यावं लागलं त्या नक्कीच यावर आवाज उठवतील आणि मी टू मोहिम बॉलिवूडमध्येही यशस्वी होईल अशी आशा इम्राननं व्यक्त केली आहे.

Story img Loader