‘अमर अकबर ऍंथनी’ चित्रपटातील ऋषी कपूर आणि नीतू सिंहवर चित्रित करण्यात आलेल्या ‘तैय्यब अली प्यार का दुश्मन’ या प्रसिद्ध गाण्याची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकवण्यासाठी इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा तयार आहेत. संगीतकार प्रितमने तयार केलेल्या नव्या स्वरुपातील या गाण्यावर हे दोन्ही कलाकार ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’मध्ये थिरकताना दिसणार आहेत. या गाण्याचे लेखन रजत अरोराने केले असून, याला नवीन स्वरूप जावेद अलीने दिले आहे. नृत्य दिग्दर्शन राजू खान याचे आहे. चित्रपटात इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा साकारत असलेल्या असलम आणि जासमीन या व्यक्तिरेखा या गाण्यातच पहिल्यांदा भेटताना दाखवले आहे. ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी १९७७ मध्ये आलेल्या ‘अमर अकबर ऍंथोनी’ या चित्रपटातील सदर गाण्याचे अधिकार खरेदी केले आहेत. या नवीन गाण्याचे चित्रिकरण सलग सहा दिवस चालणार असून, यासाठीचा सेट फिल्म सिटीमध्ये लावण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथ्राचे असून, यात अक्षय कुमार आणि सोनाली बेंद्रे यांच्यासुद्धा भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
इमरान आणि सोनाक्षी थिरकणार ‘तैय्यब अली प्यार का दुश्मन’ गाण्यावर
‘अमर अकबर ऍंथनी’ चित्रपटातील ऋषी कपूर आणि नीतू सिंहवर चित्रित करण्यात आलेल्या ‘तैय्यब अली प्यार का दुश्मन’ या प्रसिद्ध गाण्याची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकवण्यासाठी इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा तयार आहेत.
Written by badmin2

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-06-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan sonakshi sinha to reprise tayyab ali pyaar ka dushman song