अभिनेता इम्रान खानची पत्नी अवंतिका यांना कन्यारत्नाचा लाभ झाला असून, मुंबई उपनगरातील एका रुग्णालयात सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अवंतिकाने मुलीला जन्म दिला. इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ साली प्रेमविवाह केला होता. इम्रान आणि अवंतिकाला मुलगी झाल्याची बातमी कळाल्यानंतर इम्रानचा मामा आमीर खानने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याला बघण्यासाठी उत्सुक असल्याचेसुद्धा आमीरने सांगितले.

Story img Loader