अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या भव्य सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना आमंत्रित केले. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ मार्च रोजी सुरू झालेल्या अंबानी कुटुंबाच्या या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आपल्या भावना व्यक्त करत अनंत अंबानीने या खास दिवशी आई नीताचे आभार मानले. अनंत म्हणाला, “तू जे काही केलंस त्यासाठी धन्यवाद मम्मा! या सगळ्याचं प्लॅनिंग माझ्या आईनं एकटीनं केलयं. गेल्या चार महिन्यांपासून ती १८-१९ तास काम करतेय. मी मम्माचा अत्यंत ऋणी आहे.”

अंबानी कुटुंबाचे आभार मानत अनंत पुढे म्हणाला, “माझ्यासाठी आणि राधिकासाठी हा कार्यक्रम अविस्मरणीय केल्याबद्दल मी माझ्या आई-वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानतो. दोन-तीन महिन्यांपासून माझ्या कुटुंबातील प्रत्येक जण दिवसातून तीन तासांपेक्षा कमी झोपतो आहे आणि त्यामुळेच मी आज इथे सर्वांबरोबर आनंद शेअर करू शकतो आहे.”

हेही वाचा… राधिका मर्चेंटने प्री-वेडिंग सोहळ्यात अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीचा लूक केला रिक्रिएट; चाहते म्हणाले, “हा ड्रेस…”

स्वत:च्या आजाराबद्दल सांगताना अनंत म्हणाला, “माझं आयुष्य कधीच आरामदायी नव्हतं. मी लहानपणापासून आरोग्याच्या अनेक संकटांना तोंड दिलं आहे. परंतु, माझ्या आई-वडिलांनी माझी साथ कधीच सोडली नाही. त्यांनी नेहमी मला सांभाळून घेतलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.”

अनंत त्याचे विचार मांडत असताना मुकेश अंबानींचे डोळे पाणावले. शेवटी त्याने राधिकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा… VIDEO: राम चरणकडून पत्नीची सेवा; व्हायरल व्हिडीओत नेटकरी म्हणाले, “सर्वोत्कृष्ट पतीचा…”

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका यांचा हा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू आहे. जगभरातील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित आहेत. गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In anant ambani radhika merchant pre wedding anants speech made mukesh ambani cry he also thanked his mother and father dvr