बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन एकेकाळी खूप जवळ होते. रेखा आणि अमिताभ यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ यांचे लग्न जया बच्चनशी होऊनही या दोघांनी लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा होती. अमिताभ यांना रेखा पासून लांब ठेवण्यासाठी जया बच्चन यांनी खूप प्रयत्न केले. रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमसंबंधाबद्दल जेव्हा जया बच्चनला समलजे, तेव्हा त्यांनी या गोष्टीला शांतपणे घेतले. त्यांनी कधीच मीडिया समोर किंवा मित्रपरिवारा समोर यावर चर्चा केली नाही. मात्र, एक दिवस त्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी सेटवर जाणून अमिताभ यांच्या समोर रेखाला कानशिलात दिली.
निर्माता टिटो टोनी यांच्या ‘राम बलराम’ या चित्रपटात अमिताभ आणि रेखा एकत्र काम करणार होते. मात्र, जया याबद्दल खूश नव्हत्या. चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र असल्याने जया यांनी त्यांच्या मदतीने टिटो टोनीला रेखा यांच्या जागेवर झीनत अमानला घेण्याची शिफारस केली. त्यानंतर टिटोने रेखा यांच्या जागेवर झीनतला घेतले. ही बातमी रेखा यांना मिळताच त्यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद यांची भेट घेतली. त्याचवेळी रेखा यांचे लाखो चाहते होते. रेखा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. तर अशा लोकप्रिय अभिनेत्रीने दिग्दर्शकाकडे कामासाठी संपर्क साधल्यानंतर ते तिला नकार देऊ शकले नाही. तर, विजय यांनी रेखा यांना सांगितले की “तू जाऊन टिटो टोनीशी बोल.” त्यानंतर रेखा यांनी निर्मात्याची भेट घेतली आणि निर्मात्याला एक उत्तम ऑफर दिली. रेखा यांनी निर्मात्याला सांगितले की, त्या चित्रपटात विनामुल्य काम करण्यास तयार आहेत. अशी ऑफर मिळताच टिटो टोनी यांनी लगेचच झीनत आणि धर्मेंद्र यांची जोडी केली आणि रेखा आणि अमिताभ यांची जोडी केली. नंतर चित्रीकरणाला सुरूवात झाली.
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना त्या चित्रपटाला नकार देण्यासाठी सांगितले, मात्र अमिताभ यांनी नकार दिला. एक दिवस चित्रपटाच्या सेटवर जया बच्चन पोहोचल्या. त्यावेळी अमिताभ आणि रेखा यांना एकांतात बोलताना पाहून त्यांचा राग हा अनावर झाला, आणि त्यांनी अमिताभ यांच्या समोर रेखा यांच्या कानशिलात दिली. तिथे उपस्थित सगळ्यांना ते पाहुन धक्काच बसला. परंतू या नंतर झालेल्या एका मुलाखतीत यावर जया बच्चन यांना प्रश्न विचारता त्यांनी सांगितले की, “असे काही झाले असते, तर आज अमिताभ माझ्या सोबत नसते.”
अमिताभ आणि रेखा यांनी ‘दो अंजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.