एकोपाठोपाठ एक बॉलीवूड अभिनेत्री हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत. अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोणनंतर आता श्रीदेवीचे नावही या यादीत सामील झाले आहे.
तात्पुरते नामांकित करण्यात आलेले ‘काउबॉईज् अॅण्ड इंडियन्स’ या चित्रपटात श्रीदेवी काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शक रॉबर्ट रेडफॉर्डची मुलगी अॅमी रेडफॉर्ड या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यासंदर्भात श्रीदेवीला विचारले असता ती म्हणाली, सध्या आम्ही यावर चर्चा करत असून, अजून काहीही निश्चित झालेले नाही. गेल्यावर्षी श्रीदेवीने गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पुर्नपदार्पण केले. त्यानंतर, अभिषेक कपूरच्या फितूर चित्रपटातील नकारात्मक भूमिकाही तिने नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत काहीही बोलणे श्रीदेवीने टाळले.

Story img Loader