विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्रातील काही मान्यवरांना नुकतेच ‘माझा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. मुंबईत झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.‘एबीपी समुहा’चे अध्यक्ष अवीक सरकार, एबीपी न्यूज नेटवर्क प्रा. लिमिटेडचे अशोक वेंकटरमणी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या सोहळ्यात संजय मेमाणे, नाना पाटेकर (मनोरंजन क्षेत्र), सुहास बहुलकर, आरती अंकलीकर-टिकेकर (कला), संजय गायकवाड (व्यवसाय), सरोजा भाटे (साहित्य), माधव गाडगीळ, भापकर गुरुजी (सामाजिक), डॉ. संजीव गलांडे (विज्ञान), अजिंक्य रहाणे (क्रीडा) या मान्यवरांना ‘माझा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे प्रक्षेपण ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तर याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत केले जाणार आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा