अभिषेक तेली

सद्य परिस्थितीत प्रेक्षकांना दूरचित्रवाणीबरोबरच विविध ओटीटी माध्यमांवरही घरबसल्या चित्रपट पाहायला मिळत आहेत. करोनाकाळातील टाळेबंदीमुळे चित्रपटगृहे बंद राहिली. अनेक कलाकृती या ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे एखादा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत ओटीटी माध्यमांवर वा दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होईल आणि घरबसल्या सहकुटुंब पाहता येईल, याची प्रेक्षकांनाही सवय झाली आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक मोबाइलशी जोडले गेले आहेत. म्हणूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना सगळय़ाच माध्यमातून प्रसिद्धी करणे गरजेचे झाले आहे. नेहमीप्रमाणे मराठी चित्रपटांची प्रसिद्धी ही कलाकारांद्वारे मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांमधून आणि मालिकांमधून होतेच आहे. परंतु आता प्रादेशिक प्रेक्षकांचे आणि विशेषत: महाराष्ट्रातील रसिकांचे महत्त्व लक्षात घेऊन हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार हे चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या मते, यापूर्वी बॉलीवूडचे चित्रपट हे मराठी मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये प्रसिद्धीसाठी येत नसत, कारण तेव्हा त्यांना याची गरज वाटायची नाही. परंतु आता त्यांना जाणीव झाली आहे की, महाराष्ट्र हा खूप मोठा प्रदेश आहे आणि मराठी प्रेक्षकवर्ग हा मोठय़ा प्रमाणात हिंदी चित्रपट पाहतो. त्यामुळे मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीच बॉलीवूड चित्रपट हे मराठी मालिका व कार्यक्रमांमध्ये प्रसिद्धीसाठी येत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे’. तसेच आता हळूहळू जाहिरातींची संकल्पना बदलू लागली आहे आणि स्पर्धासुद्धा वाढली आहे. मराठी मालिका या मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. मराठी प्रेक्षक हा मराठी मालिका आधी पाहतो आणि मग इतर भाषेतील मालिका पाहतो. त्यामुळे एकंदरीतच चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मालिका वा कथाबाह्य कार्यक्रमांतून प्रसिद्धी गरजेची झाली आहे. शिवाय, मराठी कलाकारही वेगवेगळय़ा भाषेतील चित्रपटांमधून स्वत:चे प्रावीण्य दाखवीत असल्याने त्याचाही परिणाम साधला जात आहे, असेही गोस्वामी यांनी सांगितले.

हल्ली युटय़ूबर व रील स्टार्सच्या माध्यमातूनही चित्रपटांची प्रसिद्धी केली जाते आहे. कारण एखाद्या चित्रपटाची निर्मिती म्हणजे खर्चही मोठा असतो आणि अनेक लोकांची मेहनत त्यामागे असते. एक चित्रपट तोटय़ात जाणे म्हणजे या सर्वाचेच नुकसान टाळण्यासाठीच प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत करत आहेत. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रात रोवल्यामुळे, महाराष्ट्रातील जनता ही चित्रपटांचा पहिला प्रेक्षक आहे. म्हणूनच मराठी कार्यक्रमांमध्ये प्रसिद्धीसाठी येण्याची स्पर्धा वाढू लागली आहे. आम्ही ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात स्वत:हून प्रसिद्धीसाठी कोणत्याच चित्रपटाला आमंत्रित करत नाही, चित्रपटाची टीम ही स्वत:हून येत असते. शाहरुख खान, सलमान खान आदी हिंदी चित्रपटातील कलाकार हे स्वत:हून आले होते. याचबरोबर लोकांमध्ये असा सूर असतो की, आम्ही मराठी कार्यक्रमात हिंदी लोकांना का बोलावतो?. पण मी त्यांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा हे कलाकार आले, तेव्हा ते मराठी होऊन आले. हिंदी कलाकारांनी मराठी भाषेतच बोलावे, हा आमचा नेहमी हट्ट असतो. प्रत्येक हिंदी कलाकार तोडकीमोडकी का होईना मराठी भाषा बोलतो तेव्हा आपण जिंकलो आहोत असेच मला वाटतेह्ण, अशी भावना ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक-निवेदक डॉ. नीलेश साबळे यांनी व्यक्त केली.

‘स्टार प्रवाह’ या वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे चित्रपटांच्या प्रसिद्धीबाबत विश्लेषण करताना म्हणतात, ज्यांना प्रसिद्धी करायची आहे, ते सर्वात जास्त प्रभावी माध्यमांची निवड करतात आणि सध्याच्या घडीला दूरचित्रवाहिनी हे खूप प्रभावी माध्यम आहे. आपण टीव्हीच्या माध्यमातून घरात बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. लोक जास्तीत जास्त काय पाहतात, हे पाहून निर्माते प्रसिद्धीसाठी जातात. सध्या मराठी वाहिनीवर जाऊन प्रसिद्धी करायला हवी, असे हिंदी कलाकारांना तीव्रतेने वाटू लागले आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील मराठी वाहिन्यांची ताकद व पोहोच किती मोठी आहे, याची जाणीव हिंदी चित्रपटसृष्टीला झाली आहे. आपण फक्त हिंदी वाहिनीवर प्रसिद्धी करून चालणार नाही, मराठी प्रेक्षकवर्गही तितकाच महत्त्वाचा आहे, हे त्यांना कळले आहे. रसिकप्रेक्षक हे रोज मालिका पाहात असल्यामुळे, त्यांना मालिकेतील घडामोडी व्यवस्थित माहिती असतात. त्यामुळे एखाद्या चित्रपटाची मालिकेतून प्रसिद्धी करत असताना प्रेक्षकांचा रसभंग होणार नाही, हेही पाहिले जाते. जर मालिकेच्या वळणात्मक टप्प्यावर चित्रपटाची प्रसिद्धी होऊ शकते, चित्रपटाचा आशय आणि मालिकेतील चालू घडामोडी जुळत असतील, अशाच मालिकांची निवड चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी केली जाते.

नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपण सातत्याने मनोरंजनाचा आस्वाद घेत असतो. चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांना प्रेक्षकांना आपल्यापर्यंत आणण्यासाठी प्रसिद्धीचा मोठा खटाटोप करावा लागतो. ओटीटी माध्यमांमुळे सध्या प्रेक्षकांना घरबसल्या चित्रपट पाहण्याची सवय लागली असल्याने त्यांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी निर्मात्यांना आणि कलाकारांनाही फार मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच प्रदर्शनाआधी चित्रपटातील वैविध्यपूर्ण बाबी प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रसिद्धीवर निर्मात्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. हिंदी चित्रपटांनी तर प्रसिद्धीसाठी प्रादेशिकतेच्या सीमाही पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हिंदीतील कलाकार अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्या आणि त्यावरील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

मराठी मंचावर हिंदी कलाकारांची हजेरी
पूर्वी हिंदी चित्रपट हे मराठी कार्यक्रमांमध्ये प्रसिद्धीसाठी कमी येत होते, पण झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून त्याची सुरुवात झाली. पहिल्यांदा सोनम कपूर या ‘नीरजा’ चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता या कार्यक्रमात आल्या होत्या. यानंतर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगण, काजोल, रणवीर सिंग, विकी कौशल आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार हे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी येऊन गेले आहेत, या भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. अलीकडेच ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री पूजा हेगडे, जॅकलिन फर्नाडिस या कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमासह सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमध्ये ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनीलिया देशमुख सहभागी झाले होते.

माझ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा – रोहित शेट्टी
तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस? असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. पण यामागे काहीतरी कारण आहे. मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात. याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. असे दिग्दर्शक रोहित शेट्टी याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कथाबाह्य कार्यक्रमात सांगितले आणि मराठी कलाकारांचे कौतुकही केले.

Story img Loader