India’s Got Latent row या कार्यक्रमावरुन वाद झाला आहे. या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने एक वादग्रस्त वक्वत्य केलं होतं. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. या वक्तव्याचे पडसाद संसदेतही उमटले. तसंच या शोवरुन रणवीर अलाहाबादियाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एवढंच नाही अपूर्वा मखिजा, आशिष चंचलानी यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलिसांना त्यांनी काय सांगितलं? हे आता समोर आलं आहे.

रणवीर अलाहाबादियाने नेमकं काय म्हटलं होतं?

इंडियाज गॉट लेटेंट नावच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यानंतर वादाला तोंड फुटलं. रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्यानंतर रणवीरने माफीही मागितली. मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांनी काय सांगितलं?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्स अपूर्वा मखिजा आणि युट्यूबर आशिष चंचलानी या दोघांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये ज्या काही अश्लील कमेंट्स करण्यात आल्या त्यावरुन बराच वादंग झाला होता. यानंतर पोलिसांनी अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी या दोघांनीही जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. या दोघांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. या दोघांनीही सांगितलं की सदरचा शो हा स्क्रिप्टेड वगैरे काहीही नव्हता. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि जजेस हे उत्स्फुर्तपणे बोलत होते. अशी माहिती या दोघांनी पोलिसांना त्यांच्या जबाबात दिली. या दोघांनी पोलिसांना असंही सांगितलं की इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये जे जजेस सहभागी होतात त्यांना कुठलाही मोबदला किंवा मानधन दिलं जात नाही. तसंच जो कंटेट पोस्ट केला जातो तो पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तो कंटेट सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. तसंच या शोसाठी जि तिकिटं असतात त्या तिकिटांमधून शोमध्ये जो जिंकतो त्याला बक्षीस दिलं जातं. असंही या दोघांनी पोलिसांना सांगितल्याचं ANI ने म्हटलं आहे. अपूर्वा मखिजा आणि रणवीर अलाहबादियाचा मॅनेजर या दोघांचा जबाब खार पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने नेमकं काय सांगितलं?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की आम्ही प्रसिद्ध युट्यूबर्स, कॉमेडियन्स, इन्फ्लुएन्सर्स या सगळ्यांना समन्स बजावलं आहे. समय रैनाच्या शोमध्ये हे सगळेजण जज म्हणून बसले होते. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. कॉमेडियन अमित टंडन, नीती पलटा, मनदीप सिंग, आशिष सोलंकी, विपुल गोयल, निशांत तनवर, सोनाली ठक्कर, भारती सिंग, हर्ष लिंबचिया, पूनम पांडे या सगळ्यांचीही रैनाच्या शोमध्ये उपस्थिती होती.

समय रैनाच्या विरोधात एका महिलेने पोलिसांत केली तक्रार

समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया जे बोलले त्याची क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यानंतर सन्मिती पांडे या ३८ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सोमवारी रणवीरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे कंटेट क्रिएटर आशिष चंचलानी, इन्फ्लुएन्सर अपूर्व मुखेजा, क्रिएटर समय रैना यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी ३० जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader