मी अमेरिका व भारत या दोन्ही देशांत विभागून जीवन व्यतीत करण्याचा निर्णय अधिक विचारपूर्वक घेतला आह़े  कारण भारतीय समाज प्रतिगामी आहे आणि येथील महिलांची स्थिती तर अतिशय निराशाजनक आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने व्यक्त केले आह़े
मी आता अमेरिकेतील लॉस एंजेलीसमध्ये वास्तव्य केले आह़े  तिथे महिलांना असलेले स्वातंत्र्य अनुभवले आह़े  त्यामुळे एक स्वतंत्र  महिला म्हणून स्त्रियांच्या बाबतीत प्रतिगामी असलेल्या भारतात जाऊन तेथील स्त्रियांची स्थिती पाहाणे अत्यंत निराशाजनक असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आह़े
 ३६ वर्षीय मल्लिकाने २००३ साली ख्वाईश चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होत़े  त्यानंतर मर्डर, प्यार के साइड इफेक्ट्ससारखे चित्रपट केल़े  २००९ साली जेनिफर लिन्च यांनी दिग्दर्शित केलेल्या हिस्स्स या चित्रपटातून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केल़े  २०१० साली जॅकी चेनसोबत तिने ‘द मिथ’ हाही चित्रपट केला होता़  शेरावत बॉलिवूडच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या आगामी चित्रपटातून दिसणार आह़े  हा चित्रपट २०११ साली जोधपूर येथून बेपत्ता झालेल्या व नंतर मृतावस्थेत सापडलेली महिला परिचारिका भंवरीदेवी हिच्या जीवनावर आधारित असल्याचे कळत़े राजकारणी व्यक्तीत गुंतलेल्या व नंतर हत्या करण्यात आलेल्या एका परिचारिकेची ही कहाणी आह़े  राजकारण्याकडून बलात्कार झालेल्या आणि नंतर त्या राजकारण्याची पोलखोल करण्यासाठी झटणाऱ्या महिलेची भूमिका आपण साकारीत असल्याचे तिने सांगितल़े
हिंदी चित्रपटसृष्टीतील मर्यादांबाबतही तिने या वेळी भाष्य केल़े  २१व्या शतकात वावरत असूनही मी पहिली अभिनेत्री होते जिने पडद्यावर चुंबनदृश्य साकारले आणि बिकिनी परिधान केली़  त्यामुळे अचानक मी पतीत महिला आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री एकदम ठरल़े   कारण आघाडीच्या महिलेने पडद्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत नीती संहिता आहे, असेही ती म्हणाली़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा