भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केलं. भारताची अतिमहत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान ३ यशस्वी झाली आहे. भारताने चंद्रावर पाठवलेले यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि भारताला मोठं यश मिळालं. आता जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात सेलिब्रेशन सुरु झालं आहे. अनेक सेलिब्रिटी ट्वीट करुन इस्रोला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री मिताली मयेकर, अलका कुबल, सायली संजीव, प्रशांत दामले, शिव ठाकरे, राहुल देशपांडे, सोनाली कुलकर्णी यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : Video : “आम्हाला उत आलाय का?” जितेंद्र जोशीचा अवधूत गुप्तेला प्रश्न, भर कार्यक्रमात म्हणाला “ही खुर्ची…”
अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने “आणि अखेर चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरलं”, असं म्हटलं आहे.
गायक राहुल देशपांडे यांनी “चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं आहे. मला इस्त्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचा प्रचंड अभिमान वाटत आहे. माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! जय हिंद!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया
अलका कुबल यांची प्रतिक्रिया
सायली संजीवची प्रतिक्रिया
दरम्यान चांद्रयान मोहिमेत संध्याकाळी ५.४४ मिनिटांनी विक्रम लँडर आपली जागा घेईल. विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर रँप उघडेल आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला पहिला देश ठरला आहे.
भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं. असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.