ब्रिटिश अॅकडमी फिल्म, टेलिव्हिजन, आर्ट म्हणजेच बाफ्टा ( BAFTA) पुरस्कारांच्या नामांकनाची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आलीय. दरवर्षी सिनेसृष्टीत तसंच कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी बाफ्टा पुरस्कार दिले जातात.
यात यंदा भारतीय अभिनेता आदर्श गौरव याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं आहे. ‘द व्हाइट टायगर’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी आदर्शला नामांकित करणात आलंय. या सिनेमात आदर्शने बलरामची भूमिका साकारली आहे. या सिनेमात बलराम एका गरीब कुटुंबातील तरुण असून देशातील गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तो आवाज उठवतो आणि स्वत: च साम्राज्य निर्माण करतो. ‘द व्हाइट टागर’ या सिनेमातील अभिनयासाठी आदर्श गौरवला मिळालेल्या नामांकनासोबतच आणखी एक नामांकन या सिनेमाला मिळालं आहे. सिनेमाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका रामिन बहरानी यांना एडेप्टेड स्क्रीनप्लेसाठी नामांकन मिळालं आहे. नामांकन जाहीर झाल्यानंतर आदर्श गौरवने सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. तसंच सिनेमाच्या टीमचे आभार मानत त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
‘द व्हाइट टागर’ या सिनेमात आदर्श गौरवसोबतच प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बाफ्टा पुरस्कारांच्या नामांकनाची यादी जाहीर होताच अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे. ” दोन भारतीय कलाकारांना बाफ्टासाठी नामांकन मिळणं हा खूपच अभिमानास्पद क्षण आहे. आदर्श तुझ्यासाठी मला खूपच आनंद होतोय. तू या पुरस्काराचा खरा मानकरी आहे. रामिन बहरानी तुलाही शुभेच्छा” या सिनेमाची कार्यकारी निर्माती असल्याचा मला अभिमान वाटतोय असं म्हणत प्रियांकाने दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
What a proud moment for Indian talent with 2 BAFTA nominations for an ALL INDIAN STAR CAST!! Ecstatic for you @_GouravAdarsh, you are so deserving of this recognition, and congratulations #RaminBahrani, so well deserved.
(1/2) pic.twitter.com/lKcz678mof
— PRIYANKA (@priyankachopra) March 9, 2021
‘द व्हाइट टागर’ या सिनेमाला एकूण सात नामांकन मिळाली आहेत. यात सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रोलादेखील नामांकन मिळालंय.11 एप्रिलला लंडनमध्ये बाफ्टा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
हा सिनेमा अरविंद अडिया यांची कादंबरी ‘द व्हाइट टागर’ वर आधारित आहे. आदर्श गौरवने पहिल्यांदाच मुख्य अभिनेता म्हणून या सिनेमात भूमिका साकारली आहे. यापूर्वी तो ‘माय नेम इज खान’, ‘मॉम’ आणि नेटफ्लिक्सची सीरिज ‘लिला’मध्ये विविध भूमिकांमध्ये झळकला होता.